
मुंबईतील चर्चगेट परिसरात बेस्टच्या डबलडेकर बसला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या घेतल्या. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
सिद्धार्थ कॉलेजजवळ ही घटना घडली. बसचं पुढचं चाक मॅनहोलवर आल्यानंतर मॅनहोलचं झाकण उघडलं आणि बसच्या बॅटरीला लागलं. यामुळे आग लागली. ही बस सीएसएमटीहून मंत्रालयाकडे चालली होती. यादरम्यान आगीची घटना घडली. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.