माहुल फेस्टिव्हल कोळी महोत्सवाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहुल ग्राम समिती-माहुल ग्राम हनुमान मंदिर ट्रस्ट रजि. आणि विश्वस्त समितींचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर यांच्या सौजन्याने 19 ते 22 मार्च या कालावधीत माहुल फेस्टिव्हल कोळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडणार आहे. माहुलकर मनोरंजन मैदान, माहुल गांव, चेंबूर येथे आयोजित महोत्सवाची सुरुवात 19 मार्च रोजी संध्याकाळी 6 वा. वाजता होणार आहे. यावेळी श्री एकवीरा आई देवी पालखी मिरवणूक हनुमान मंदिर ते माहुल मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. या महोत्सवात पारंपरिक नृत्य, नाट्य या कार्यक्रमांबरोबरच आगरी-कोळी समाजातील चविष्ट आणि चमचमीत मटण, मासे आणि तांदळाची भाकरी अशा खाद्यपदार्थांची मेजवानीही मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक संख्येने लोकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष राजेंद्र माहुलकर, माजी नगरसेविका सीमा माहुलकर, सेक्रेटरी आशिष चव्हाण, उपसेक्रेटरी जगन्नाथ पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.