Mumbai News – पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; अनेक लोकल ट्रेन रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन तब्बल 20 ते 40 मिनिटे उशिराने धावत आहेत. विशेषत: चर्चगेटला जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असल्यामुळे नोकरदारांना मोठा फटका बसला आहे.

मालाड आणि कांदिवली स्थानकांदरम्यान देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 102 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये 15 डब्बा लोकल तसेच एसी लोकलचा समावेश आहे. त्यामुळे सर्वच श्रेणींतील प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सायंकाळपर्यंत हीच परिस्थिती राहण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.