Mumbai News – बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला चालले होते, वाटेत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू एक जखमी

बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला जात असताना बाईकला अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील गोराई परिसरात मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही तरुण सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत. तिघे गोराई येथे पिकनिकसाठी आले होते. यावेळी वैराल तलावाजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांची दुचाकी घसरली. दुचाकीचालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही. यामुळे अपघात झाला आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला.