
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडने क्रांतिकारी प्रकल्पाची घोषणा केली आहे. यामुळे ग्रीनहाऊस गॅसेसचे शाश्वत, हरित इंधनात रुपांतर होणार आहे. हे तंत्रज्ञान औद्योगिक सीओटू उत्सर्जनाचे थेट डिमथाईल इथर या कमी उत्सर्जन करणाऱ्या पर्यावरणपूरक ऊर्जा वाहकात रूपांतर करते. डिमथाईल इथर हे हरित पद्धतीने जळणारे इंधन असून ते एलपीजी आणि डिझेल यासारख्या पारंपरिक ऊर्जास्रोतांची जागा घेऊ शकते व पर्यायाने कमी उत्सर्जन, सुधारित पर्यावरण आणि डिकार्बनायझेशन घडण्यास मदत होईल, असे व्यवस्थापकीय संचालक समीर सोमय्या यांनी सांगितले.




























































