
मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव एक महत्त्वाचा आदेश जारी केला असून त्यानुसार 11 मे ते 9 जून या कालावधीत मुंबई शहरात फटाके पह्डण्यावर बंदी घातली आहे.
मुंबई शहरात कुठल्याही व्यक्तीने फटाके, रॉकेट्स उडवू अथवा फेकू नये असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. फटाके पह्डताना किंवा रॉकेट्स उडवताना कोणी सापडल्यास संबंधितांवर आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होईल आणि त्या गुह्याच्या अनुषंगाने जी कारवाई असेल ती केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.