
अलीकडेच विधान भवन, मुंबई स्टॉक एक्सचेंजला धमकीचे मेल आल्याची बाब ताजी असतानाच आज मुंबई प्रेस क्लबला धमकीचा ई-मेल आला. 42 छोट्या विषारी गॅसने क्लब दुपारी 1 वाजता उडवून देणार असे धमकीत म्हटले होते. पण अखेर हा कोणी तरी खोडसाळपणा केल्याचे निष्पन्न झाले. प्रेस क्लबमध्ये दिवसभर पत्रकारांचा राबता असतो. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण करण्याकरिता अशाप्रकारे क्लबला धमकीचा ई-मेल केल्याचे बोलले जाते. आज सकाळी नीराजा अमजद खान या नावाने प्रेस क्लबमध्ये धमकीचा मेल आला. क्लबमध्ये 42 विषारी गॅसचे छोटे बॉम्ब पेरले असून दुपारी 1 वाजता त्यांचा स्पह्ट होईल, असे त्या ई-मेलमध्ये म्हटले होते. याची तत्काळ दखल घेत क्लबच्या पदाधिकाऱयांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस तेच बॉम्बशोधक व नाशक पथकाने क्लबची झाडाझडती घेतली असता आक्षेपार्ह काहीच आढळून आले नाही.






























































