मुस्लिमांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान असावा! बाबा रामदेव

 ‘हिंदू व सनातनी असल्याचा मला अभिमान आहे, तसाच प्रत्येक मुसलमानाला तो मुस्लिम असल्याचा अभिमान असायला हवा,’ असे वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. कावडयात्रेच्या मार्गावर अनेक मुस्लिम व्यावसायिक दुकानांची व ढाब्यांची नावे लपवून किंवा बदलून व्यवसाय करतात. त्यावरून सुरू असलेल्या वादावर रामदेव बाबांनी प्रतिक्रिया दिली.

‘सर्व मुसलमानांचे पूर्वज हिंदूच होते. त्यामुळे नाव लपवण्यात काही अर्थ नाही. आपली खरी ओळख जाहीर केली पाहिजे. ज्याला कोणाला तुमच्याकडे येऊन खायचे असेल तो खाईल. नाव लपवणे हे नैतिक, धार्मिक आणि व्यावहारिक कुठल्याही दृष्टीने योग्य नाही,’ असे रामदेव म्हणाले.