ट्रेंड – एक लाखाची दुचाकी, दंड 21 लाखांचा

वाहतुकीचा नियम मोडल्यास काही हजार रुपयांपर्यंत दंड आकरण्यात येतो. मात्र, एका दुचाकीस्वाराला त्याच्या गाडीच्या किमतीपेक्षा सुमारे 21 पट दंड ठोठावण्यात आल्याचा प्रकार मुझफ्फरनगर जिह्यात घडला आहे. या वाहनचालकाला विना हेल्मेट वाहन चालविल्यामुळे पोलिसांनी तब्बल 20.74 लाख रुपयांचा दंड ठोठावला. न्यू मंडी भागात तपासणी सुरू असताना अमोल सिंघल या स्पूटरचालकाला थांबविण्यात आले. त्याच्याकडे इतर कागदपत्रेही नव्हती. पोलिसांनी त्याची स्पूटर जप्त केली. मात्र, दंडाची रक्कम पाहून त्याला मोठा धक्का बसला. त्याच्या गाडीची किंमत जेमतेम लाखभर असेल. पावतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी दंडाची रक्कम 4 हजार एवढी केली.