
मी जात आणि धर्माच्या आधारावर कधीही भेदभाव करत नाही. जो करेगा जात की बात, उसको मारूंगा लात असे मी म्हणत आलो आहे. निवडणूक हरलो किंवा मंत्रिपद मिळाले नाही तर मी काही मरणार नाही. मी माझ्या तत्त्वांवर आधीपासून ठाम राहिलो आणि राहीन, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूर येथील एका दीक्षांत समारोहामध्ये नितीन गडकरी बोलत होते. इतर कुठल्याही समाजापेक्षा मुस्लिम समाजाला शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे. दिवसातून अनेक वेळा नमाज पठण करा, मात्र नमाज पठणाबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञानाचे ज्ञान घेणेही गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.