मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी तर विभाग क्र. 9 मधील महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तसेच विभाग क्र. 9 मधील महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विभाग क्र. 6 मधील शिवसेना पदाधिकारी – विधानसभा प्रमुख – मनीष मोरजकर (कुर्ला विधानसभा), विधानसभा संघटक – सुरेश बोराडे (शाखा क्र. 149, 151, 169), किसन मदने (शाखा क्र. 165, 167, 168), स्वप्नील येरुणकर (शाखा क्र. 170, 171), उपविधानसभा संघटक – सचिन उमरोटकर (शाखा क्र. 149, 151, 169), संतोष घाग (शाखा क्र. 165, 167, 168), मोहन तावडे (शाखा क्र. 170, 171), उपविभागप्रमुख – राजेंद्र साटम (शाखा क्र. 149, 151, 169), समीर हिरडेकर (शाखा क्र. 165, 167, 168), अनंत गांधी (170, 171).

विभाग क्र. 9 मधील महिला पदाधिकारी – विधानसभा प्रमुख – सुलभा पत्याने (शाखा क्र. 150, 152, 153), रुक्मिणी भोसले (शाखा क्र. 154, 155), विधानसभा संघटक – विनयना सावंत (चेंबूर विधानसभा – शाखा क्र. 150, 152, 153, 154, 155), उपविभाग संघटक – मुन्नी मदने (शाखा क्र. 150, 152, 154), छाया हमिदानी (शाखा क्र. 153, 155), विधानसभा समन्वयक – दर्शना कोंडविलकर (शाखा क्र. 150, 155 लाल डोंगर).