Nashik News – नाशिक महानगरपालिकेत सुधाकर बडगुजर यांना दणका, पुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव

नाशिक महानगरपालिकेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंड करत पक्षातून बाहेर पडलेल्या, गद्दार सुधाकर बडगुजर यांना मतदारांनी दुसरा दणका दिला आहे. पुत्र दीपक बडगुजर प्रभाग २९ मधून पराभूत झाले असून, भाजप बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे मोठ्या फरकानं विजयी ठरले आहेत. दोन एबी फॉर्म दिल्यानं मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला होता. बडगुजर पिता पुत्रांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती.