
फॉर्मच्या पळवापळवीतून प्रभाग 29 मध्ये दीपक बडगुजरने भाजपाची उमेदवारी पदरात पाडून घेतली, यामुळे अर्ज बाद झालेल्या माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी आव्हान दिले. त्यांच्यातील या वादाने प्रचार काळात टोक गाठले आहे. बडगुजर समर्थकाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने शहाणे संतापले, तर दीपक बडगुजरने कार्यकर्ता हर्षल थोरातला मतदारांच्या स्लिप वाटपावेळी मारहाण झाल्याचा बोभाटा केला आहे. मतदारांचा डेटा असलेली वही फाडून त्याच्या कानशिलात लगावली. याबाबत अंबड पोलिसांत अदखलपात्र गुह्याची नोंद घेण्यात आली आहे.


























































