
देशभरात मानाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून 1 ऑगस्ट रोजी 71 राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. ‘श्यामची आई’ हा सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा मानकरी ठरला आहे.
सुजय डहाके यांनी ‘श्यामची आई’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर, गौरी देशपांडे, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, ओम भूतकर, मयुर मोरे आदि कलाकारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी शाहरुख खान आणि विक्रम मेस्सी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी तर विक्रम मेस्सीला ‘ट्वेल्थ फेल’ चित्रपटासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाहरुख खानचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारावरसाठी राणी मुखर्जीची निवड करण्यात आली आहे. ‘मिसेज चटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी राणी मुखर्जीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी सुदीप्तो सेन यांना ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात येणार आहे.