
इराण-इस्रायल युद्धामुळे विमान इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे आता विमान कंपन्या ‘फ्यूएल सरचार्ज’ लावत आहेत. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने तिकीट दरात वाढ केली होती. 12 मार्चपासून देशांतर्गत प्रवासावर 399 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या तिकीट दरातही मोठी दरवाढ करण्यात येणार असल्याचे एअर इंडियाने सांगितले होते. एअर इंडियानंतर आता अकासा एअरच्या विमानांचाही प्रवास महागला आहे. उद्यापासून अकासा कंपनीही ‘फ्यूएल सरचार्ज’ लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एअर इंडियानंतर आता अकासा एअरच्या विमानांचाही प्रवास महागला असून इराण-इस्रायल युद्धाचा फटका प्रवाशांना बसत आहे.

























































