
दिल्लीत चार मजली इमारत कोसळल्याने सहा जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या ठाणे वेलकम परिसरात शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. दुर्घटनेत 8 जण जखमी झाले आहेत. इमारतीखाली अनेक जण अडकल्याची शक्यता आहे. बचाव कार्य सुरू आहे. अपघातग्रस्त परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या सात गाड्या आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाल्या. मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. इमारत जुनी आणि जीर्ण झाली होती. यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.