एआय वेळ वाचू शकते, पण न्यायाधीश आणि वकिलांची जागा घेऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचे स्पष्ट मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एआय वेळ वाचू शकते पण न्यायाधीशांच्या नैतिकतेची जबाबदारी व वकिलाच्या प्रशिक्षित बुद्धीची जागा एआय घेऊ शकत नाही, असे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, एआयने वेळ वाचू शकतो व काही न्यायालयीन कामात त्याची मदत होऊ शकते. एखाद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एआयची मदत होऊ शकते, मात्र याद्वारे कायदा तयार करता येणार नाही.

तेलंगणातील एक परिषदेत मार्गदर्शन करताना न्या. नाथ यांनी एआयच्या वापरावर भाष्य केले. एआय हे केवळ एक साधन आहे व एक साधनच राहिले पाहिजे. एआयच्या गैरवापराबाबत न्यायपालिकेने टोकाची भूमिका घेऊ नये, असा सल्ला न्या. नाथ यांनी दिला.

नवीन गुह्यांची भीती

तंत्रज्ञान न्यायपालिकेचे काम सोपे करू शकते, पण निष्काळजीपणा केल्यास नवीन प्रकारचे गुन्हे तयार होऊ शकतात, अशी भीती न्या. नाथ यांनी व्यक्त केली.

जबाबदारीने वापर आवश्यक

तंत्रज्ञान नवीन आहे म्हणून ते नाकारू नये किंवा वेगवान व कार्यक्षम आहे म्हणून ते स्वीकारूही नये. मुळात तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायला हवा, असे न्या. नाथ यांनी नमूद केले.