स्कूल बसला रेल्वेची धडक, तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू; अनेक जखमी

रेल्वे फाटक क्रॉस करताना स्कूल बसला रेल्वेची धडक बसल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. चालकासह अन्य विद्यार्थी जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी कुड्डालोर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तामिळनाडूतील कडलूर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली.

ट्रेन येत असल्याने गेटकिपर फाटकाचे गेट बंद करत असताना बसचालकाने ट्रॅक कॉस करण्याचा आग्रह केला. बसचालकाच्या चुकीमुळेच हा अपघात घडला. रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करत असतानाच विल्लुपुरम-मयिलादुथुराई पॅसेंजर सर्व्हिस ट्रेनने बसला धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रेनने बसला 50 मीटरपर्यंत फरफटत नेले. यात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर एका विद्यार्थ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कुड्डालोर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.