दाट धुक्यामुळे भीषण अपघात, दिल्ली-डेहराडून कॉरिडॉर एक्सप्रेसवेवर 14 वाहने एकमेकांवर धडकली

दाट धुक्यामुळे उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने दिल्ली-डेहराडून कॉरिडॉर एक्सप्रेसवेवर 14 वाहने एकमेकांवर आदळली. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.