पत्नीला सरप्राईज देण्यासाठी हेअर ट्रान्सप्लान्ट करायला गेला, पण इंजेक्शन देताच होत्याचं नव्हतं झालं

हेअर ट्रान्सप्लांट करणे एका इंजिनिअर तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हेअर ट्रान्सप्लांट करताना इंजेक्शन देताच तरुणासोबत भयंकर घडलं आणि अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे घटनेची दखलच पोलिसांनी घेतली नाही. तब्बल 54 दिवसांनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

विनित दुबे असे मयत इंजिनिअरचे नाव आहे. विनित मूळचा गोरखपूरचा असून, ते पंकी पॉवर हाऊसमध्ये असिस्टंट इंजिनिअर म्हणून काम करत होते. विनित विवाहित असून त्यांना दोन मुलं आहेत. होळीच्या सणानिमित्त पत्नी दोन मुलांसह माहेरी गेली होती. माहेरी गेली होती. पत्नीला सरप्राईज देण्यासाठी विनित एम्पायर वाराही क्लिनिकच्या डॉ. अनुष्का तिवारींकडे गेला.

हेअर ट्रान्सप्लान्ट करताना विनित इंजेक्शन देण्यात आलं. मात्र यानंतर विनितची प्रकृती बिघडली. विनितचा चेहरा सूजला, त्याचे डोळे बाहेर आले. डॉक्टरांनी त्याला शारदानगर येथील रुग्णालयात दाखल केले. डॉ. अनुष्काने विनितच्या पत्नीला फोन करून त्याच्या चेहऱ्यावर सूज आल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. यानंतर अनुष्का गायब झाली.

विनितची प्रकृती बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला रिजन्सी नर्सिंग होममध्ये दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डॉ. अनुष्का तिवारी हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक आणि फोन बंद करुन फरार झाली. विशेष म्हणजे पोलिसांनी तब्बल 54 दिवस या घटनेची दखल घेतली नाही. अखेर विनितच्या पत्नीने सर्व ऑडिओ-व्हिडिओ आणि इतर पुराव्यांसह सीएम पोर्टलवर डॉ. अनुष्काविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर रावतपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलीस फरार डॉक्टरचा शोध घेत आहेत.