
नवी मुंबईतीत महापे एमआयडीसीमध्ये शनिवारी दुपारी अग्नितांडव पाहायला मिळाली. दुपारी साडे बाराच्या सुमारास बिटाकेम केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आगीमुळे आकाशामध्ये काळ्या धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, या अग्नितांडवचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून आगीची दाहकता स्पष्ट दिसत आहे.
नवी मुंबईत अग्नितांडव! महापे एमआयडीसीतील बिटाकेम या केमिकल कंपनीला भीषण आग #viralvideo pic.twitter.com/FU75OL6KrI
— Saamana Online (@SaamanaOnline) January 24, 2026

























































