नवी मुंबईत नाईकांनी केला शिंदेंचा टांगा पलटी!

शिंदे गटाने अत्यंत प्रतिष्ठsच्या बनवलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अक्षरशः धोबीपछाड दिला. आव्हान दिल्याप्रमाणे नाईकांनी शिंदेंचा टांगा पलटी करून घोडेही फरार केले. या निवडणुकीत भाजपने 65 जागा मिळवून एकहाती सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाला 42 जागा मिळाल्या.