NCERT ला ‘मानद विद्यापीठा’चा दर्जा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (NCERT)आता अधिकृतपणे ‘मानद विद्यापीठ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या अधिकृत घोषणेमुळे NCERT आता विविध अभ्यासक्रमासाठी स्वत:च्या पदव्या प्रदान करण्यास पात्र झाली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिल्याचे पीटीआयचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अधिकृत अधिसूचनेत असे म्हटले आहे की, ‘शिक्षण मंत्रालयाने, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) सल्ल्यानुसार, NCERT आणि त्यांचे घटक असलेले सहा युनिट्स विशिष्ट श्रेणी अंतर्गत मानद विद्यापीठ म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

यामध्ये अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँग येथील प्रादेशिक शिक्षण संस्थांसह भोपाळमधील पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्थेचा समावेश देखील करण्यात आला आहे.