बहिणीला भीक नको… दाजीला नोकरी द्या, राष्ट्रवादीचे आंदोलन

मिंधे सरकार विविध शासकीय विभागांमध्ये कंत्राटी भरती विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने मिंधे सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मंत्रालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. ‘बहिणीला भीक नको… दाजीला नोकरी द्या’, अशा घोषणा देत हजारो विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये 6 हजार 800 पदे खासगी कंत्राटदाराकडून भरली जाणार आहेत. यात भाजपच्या एका आमदाराच्या कंपनीचाही समावेश आहे. या भरतीविरोधात युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.