
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. तेव्हा नारायण राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना चिथावण्याचा आणि मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना जोरदार टोला लगावला आहे. या गोष्टीचा किती अतिरेक करायचा हे स्थानिकांनी ठरवलं पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.
मालवणात राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. या प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे. महाराष्ट्रासाठी ही अत्यंत लाजिरवाणी घटना घडलेली आहे. असं कधीही घडलेलं नव्हतं. अशावेळी अनेक लोक इथे येणार, स्थळाला भेट देणार. स्थानिक लोकांनी किती याचा अतिरेक करायचा हे ठरवलं पाहिजे. अशा प्रकारची कोणी भूमिका घेऊ नये. याच्यात सामंजस्याची भूमिका घ्यावी. नारायण राणे यांची टीम पुतळा पाहून बाहेर जात होती, आम्ही आधीपासूनच आत होतो. त्यात बाचाबाची झाली. यात सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.