50 KG सोने, 50 कोटींची डायमंड ज्वेलरीचा केला बंदोबस्त; पुरावे नष्ट करणारा नेहल मोदी सापडला यंत्रणाच्या जाळ्यात

पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. भाऊ नीरवला वाचवण्यासाठी त्याने सर्व पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. आता त्याला अटक झाल्याने त्याच्या प्रर्त्यापणाचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. तो तपास यंत्रणाच्या जाळ्यात सापडल्याने या प्रकरणात आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

13 हजाराहून अधिक कोटींच्या पीएनबी घोटाळा प्रकरणात देश सोडून पळालेला नीरव मोदी याचा भाऊ नेहल दीपक मोदी याला अटक झाल्यानंतर त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमेरिकेतील कायद्यानुसार त्याला तपास यंत्रणाच्या मागणीवरुन अटक झाली आहे. नेहल मोदीवर नीरव मोदीला घोटाळ्यात मदत केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्यावर पुरावे लपवणे, साक्षीदारांना धमकावणे, घोटाळ्यातील पैसा आणि संपत्तीला लपवण्यात सक्रीय सहभागाचा आरोप लावण्यात आला आहे.

नेहल याने दुबई स्थित Firestar Diamond FZE कंपनीकडून 50 किलो सोने घेतले आणि ते गायब केले. तो स्वत: सर्व परिस्थिती हाताळत होता. त्याच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व आवश्यक रेकॉर्ड, खाती आणि डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न करीत होता. नेहल मोदी याने हाँगकाँगहून सुमारे 6 अब्ज डॉलर ( सुमारे 50 कोटी रुपये ) ची डायमंड ज्वेलरी, 150 बॉक्स मोती आणि दुबईतून 3.5 दशलक्ष दीरहम कॅश तसेच 50 किलो सोने आपल्या ताब्यात घेतले. या सर्व कामासाठी त्याने त्याचा अन्य एक साथीदार मिहिर भंसाळी याची मदत घेतली. सक्तवसुली संचनालयाच्या (ED) आरोपानुसार नेहल याने न केवळ फिजिकल पुरावे हटवले, कर डिजिटल पुरावे उदाहरणार्थ मोबाईल फोन आणि सर्व्हरला देखील नष्ट केले. दुबईतील सर्व डिजिटल डेटा संपूर्णपणे नष्ट केला आहे.

नेहल मोदी याने काही साक्षीदारांना घाबरुन कैरोला पाठवले, तेथे त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि त्यांच्याकडून खोट्या दस्ताऐवजांवर सह्या घेतल्या गेल्या. एक प्रकरणात तर नेहल याने एका साक्षीदाराला 2 लाख रुपयांची लाच देऊन युरोपच्या कोर्टात खोटी साक्ष देण्यास राजी केले. ED च्या मते नेहल मोदी याने PMLA कायद्याचे कलम 3 अंतर्गत मनी लॉन्ड्रींगमध्ये सामील राहून गुन्हा केला आहे. आणि त्याला कलम 4 अंतर्गत कठोर शिक्षा व्हायला हवी. भारत सरकारने नेहम मोदी याच्या प्रत्यार्पणाची अधिकृतपणे मागणी केली होती. त्यावर अमेरिकेच्यावतीने कारवाई झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नेहल मोदी याला देशात आणण्याची प्रक्रीया सुरु होणार आहे.