
दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून शेजार्याशी वाद घालून त्याच्या कुटुंबावर हल्ला केल्याची घटना कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर येथे घडली आहे. या घटनेत हल्लेखोर बापलेकांनी केलेल्या लाकडी दांडक्यांच्या मारहाणीत शेजाऱ्याच्या 19 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे सानिया बागबान असे मृत मुलीचे नाव आहे याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
कल्याण पश्चिमेकडील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद हे आपल्या पत्नी व मुलीसह राहतात.निसार सय्यद हे भाजी विक्रीचा व्यवसाय करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.ते घरी जेवत असताना याच परिसरात राहणारा गुलाम शेख हा त्यांच्या घरी आला त्याने त्यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले असता निसार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने या दोघांमध्ये वाद झाला . याच वादातून गुलाम यांचा मुलगा अब्दुल शेख त्याचा मित्र शोएब शेख अजित शेख व शाहीर शेख यांनी निसार यांच्या घरात घुसून निसार यांना बेदम मारहाण केली यावेळी निसार यांचे पत्नी झुलेखा व मुलगी सानिया या दोघी निसार याना सोडवण्याकरता आल्या असता या दोघींना देखील त्यांनी धक्काबुक्की केली. या दरम्यान अब्दुल याने त्यांचे मुलगी सानिया यांच्या लाकडी दांडक्याने हल्ला केला या हल्ल्यात सानिया बागवान हिचा मृत्यू झालाय. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुलाम शेख उर्फ मुन्ना शेख त्याचा मुलगा अब्दुल शेख आणि त्याचे सहकारी शोएब शेख, अजिज शेख, शाहिद शेख या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.