मुंबईत 67 अब्जाधीश! न्यूयॉर्क टॉपवर

अमेरिकेतील न्यूयॉर्क हे जगातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर आहे. फोर्ब्ज 2025 च्या यादीनुसार, न्यूयॉर्कमध्ये 123 अब्जाधीश आहेत. त्यांची एकूण संपत्ती 759 अब्ज डॉलर आहे. अब्जाधीशांच्या शहरांच्या यादीत मुंबई सहाव्या नंबरवर आहे. मुंबईतील अब्जाधीशांची संख्या 67 आहे, तर त्यांची एकूण संपत्ती 349 अब्ज डॉलर आहे. याबाबत दिल्ली आणि बंगळुरू शहरे खूप मागे आहेत. मागील 12 वर्षांत न्यूयॉर्कने अब्जाधीशांच्या संख्येत पहिला नंबर कायम ठेवला आहे. अपवाद फक्त 2021 सालचा. 2021 मध्ये बीजिंग पहिल्या क्रमांकावर होता. तिथले अब्जाधीश हे अर्थ, रिअल इस्टेट आणि रिटेल क्षेत्राशी संबंधित आहेत.

जागतिक स्तराचा विचार केला तर सहा देशांमधील 10 शहरांमध्ये 3028 अब्जाधीश राहतात. उद्योग व्यवसायाला अनुकूल वातावरण, गुंतवणूक धोरण अशी अनेक कारणे यामागे आहेत.

न्यूयॉर्कमध्ये 123 अब्जाधीश, मॉस्कोमध्ये 90, त्याखालोखाल हाँगकाँगमध्ये 71 अब्जपती आहेत. लंडनमध्ये 71, तर बीजिंगमध्ये 68 अब्जाधीश आहेत.