
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री निमरत कौर आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या डेटिंगच्या चर्चांना पेव फुटले आहेत. आता या चर्चांवर निमरत कौरने प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
काही माध्यमांनी दावा केला आहे की,अभिनेत्री निमरत कौरमुळे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. पण आता या सर्व अफवांवर निमरतने सडेतोड उत्तर दिले आहे. नुकतेच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत निमरत कौर म्हणाली की, ”मी काहीही करु शकते आणि लोकं त्यांना जे हवे तेच बोलतील. या चर्चा थांबणाऱ्या नाहीत आणि मी माझ्या कामावर लक्षकेंद्रित करणं पसंत करते”. अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या कथित नात्याबाबत अनेक आठवड्यांपासून अफवा पसरल्यानंतर निमरतची ही प्रतिक्रिया आली आहे. अभिनेत्रीने यावर जोर दिला की ती तिच्या गोपनीयतेला महत्त्व देते आणि निराधार चर्चांकडे दुर्लक्ष करु इच्छिते.
अभिषेक बच्चन आणि अभिनेत्रीचा एक व्हिडिओ रेडिटवर व्हायरल झाला होता. त्य़ानंतर अभिषेक बच्चन आणि निमरत कौरच्या कथित अफेअरच्या अफवांना उधाण आले होते. जेव्हा या जोडीने 2002 मध्ये ‘दसवी’ या सिनेमात काम केले होते. ज्यामध्ये निम्रतने अभिषेकच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीच्या लग्नात वेगवेगळे पोहोचले होते. मात्र, नंतर ऐश्वर्याला बच्चन घरात आराध्यासोबत पाहून चाहत्यांना दिलासा मिळाला. घटस्फोटाच्या सर्व अफवांदरम्यान, अभिषेक नवीन मालमत्तांमध्ये गुंतवणूक करत आहे.