
कोणत्याही वस्तूंवर जीएसटी उकळणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारने फ्लॅटच्या मेंटेनन्सलाही सोडले नाही. फ्लॅटच्या मेंटेनन्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जात असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. मेंटेनन्स चार्जमध्ये लिफ्ट चार्ज, सिक्योरिटी आणि क्लिनलीनेस यासारख्या चार्जचा समावेश आहे. जर हाऊसिंग सोसायटीचा वार्षिक टर्नओव्हर 20 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना जीएसटी द्यावा लागतो. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यात ही रक्कम 10 लाखांपर्यंत आहे.
जर तुम्ही कोणत्याही हाऊसिंग सोसायटी किंवा अपार्टमेंट राहत असाल आणि मेंटेनन्स म्हणून 7500 रुपयांपेक्षा जास्त रक्कम देत असाल तर त्यावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. जर मेंटेनन्स 7500 रुपयांपेक्षा कमी असेल तर जीएसटी द्यावा लागणार नाही.