Budget 2026 – निर्मला सीतारामन यांनी दीडतास केले भाषण…पण सर्वसामान्यांची झोळी रिकामीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा लोकसभेचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये त्यांनी जवळपास दीड तास भाषण केले. विशेष म्हणजे हे भाषण मागच्या भाषणापेक्षा थोडे मोठे होते. शिवाय या भाषणाने सर्वात जास्त वेळ चालणारे भाषण म्हणून रिकॉर्ड बनवले आहे मात्र तरीही पण सर्वसामान्यांची झोळी रिकामीच पाहायला मिळाली आहे.

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज रविवारी लोकसभेत 1 तास 25 मिनीटांचे भाषण केले. हे भाषण मागच्यावर्षीच्या तुलनेत फार मोठे झाले आहे. त्यांनी 11 वाजता भाषण द्यायला सुरुवात केली ते 11 वाजून 25 मिनीटांनी समाप्त झाले. निर्मला सितारामन जेव्हा अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळी त्यांचे भाषणच नव्हे तर त्यांची साडीही चर्चेत असते. एवढेच नाही तर अर्थसंकल्प सादर करताना त्यांची बॅग आणि त्यांचा अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत सर्वच चर्चेचा विषय बनतं. त्यामुळे आता त्यांनी केवढ मोठे भाषण दिले आहे तेही चर्चेचा विषय बनले आहे.

निर्मला सितारामन यांनी सर्वात जास्त आणि अधिक शब्दांचा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड केला आहे. एवढेच नाही तर कोणताही पेपर न घेता त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.