
गणेशोत्सवात जमा होणारे निर्माल्य आणि त्याची विल्हेवाट हा नियमित भेडसावणारा प्रश्न आहे. याचा परिणाम जलचरांवर आणि सागरी संपत्तीवर होतो. याविषयी जनजागृतीसाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान निर्माल्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे.
राज्यपालांचे स्वच्छता दूत आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संकल्पनेतून डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मुंबईत गिरगांव चौपाटी आणि जुहू चौपाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी गिरगांव व जुहू येथे सुमारे 6500 किलो निर्माल्य संकलित करुन त्यापासून गांडूळ खत बनविण्यात आले.