
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) ने आता 9 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर सुद्धा हॉलमार्ंकग बंधनकारक केले आहे. याआधी 24 कॅरेट, 23, कॅरेट 22 कॅरेट, 18 कॅरेट, 14 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्ंकग केले जात होते. परंतु, आता 9 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क दिसणार आहे. बीआयएसच्या या निर्णयाचा आता सर्व ज्वेलर्स आणि हॉलमार्ंकग सेंटरना नियमांचे पालन करावे लागेल.