आली दिवाळी- दिवाळीनिमित्त विविध सेल, ऑफर्सचा धमाका

दिवाळीनिमित्त ई-कॉमर्स साईट्सवर विविध सेल सुरू आहेत. अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल, फ्लिपकार्टवर बिग बँग दिवाली सेल, विजय सेल्स यासह विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरू असून ग्राहकांसाठी ऑफर्सचा धमाका करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर आयफोन 16 स्वस्त किमतीत मिळत आहे. एसबीआय व्रेडिट कार्ड ईएमआय, फ्लिपकार्ट ऑक्सिक बँक व्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास 4 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन, दिवाळी गिफ्टवर अनेक ऑफर मिळत आहे. आयफोन 15 वर 31 टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डवर 10 टक्के सूट दिली जात आहे. विजय सेलमध्ये घरगुती सामान, लॅपटॉप, एसी, टीव्ही, डिशवॉशर, मिक्सर ग्राइंडर, टोस्टर आणि ब्लेंडर स्वस्तात मिळत आहे. एचडीएफसी, एचएसबीसी, आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर वेगवेगळे इंस्टेंट पॅशबॅक दिले जात आहे.