
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या ‘ओ रोमियो’ने पहिल्याच दिवशी 8.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर शनिवार आणि रविवारी चांगला गल्ला जमवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘ओ रोमियो’ या चित्रपटाने शाहिद कपूरचा याआधीचा चित्रपट ‘देवा’ला मागे टाकले आहे. ‘देवा’ने पहिल्या दिवशी केवळ 5.5 कोटींची ओपनिंग केली होती. तर शाहिदच्या कबीर सिंहने 20 कोटींची ओपनिंग केली होती. ‘ओ रोमियो’साठी शाहिद कपूरने 45 कोटी तर तृप्तीला 6 कोटी रुपये फी मिळाले.
























































