
हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रीडा आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.
श्रीनिवासन हे ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधून उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले. पीटी उषा यांच्या क्रीडा आणि राजकीय कारकीर्दीत त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. उषा यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांनी साथ दिली. शुक्रवारी सकाळी श्रीनिवासन अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.



























































