Ratnagiri News – अणुस्कुरा घाटातून एकेरी वाहतूक सुरू

राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात कोसळल्याने दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. बांधकाम विभागाने दोन दिवस अथक प्रयत्न करून अखेर घाटातील ढिगारा हटवल्याने एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. सोमवारी दुपारनंतर अणुस्कुरा घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली. शनिवारी पहाटे अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती. त्यानंतर दोन दिवस घाटातील वाहतूक ठप्प होती.

घाटरस्ता वाहतुकीसाठी मोकळा होण्यामध्ये अडथळा ठरणारे दगड फोडण्यात बांधकाम विभागाला यश आले आहे. यामुळे तिसर्‍या दिवशी दुपारनंतर घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. रात्री उशिरा दुहेरी वाहतूक सुरू होण्याचाही अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, अद्यापही घाटामध्ये दोन-तीन मोठे दगड रस्त्यामध्ये असून ते फोडण्याचे आव्हान अद्यापही कायम ठाकलेले आहे.