सावधान! आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे होताहेत बँक खाती रिकामी, ऑनलाईन स्कॅम आणि घोटाळेही वाढले

व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फसवणूकीच्या माध्यमातून मोठी आर्थिक फसवणूक होत असून ऑनलाईन स्कॅम आणि घोटाळेही वाढल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने याबाबत सावध राहाणे गरजेचे असल्याचे वनकार्ड कंपनीने म्हटले आहे. सायबर गुन्हेगार लोकांची स्क्रीन शेअरिंग सुरू करायला लावतात आणि त्यांची खासगी माहिती म्हणजेच ओटीपी, बँक डिटेल्स, पासवर्ड आणि मॅसेजेस चोरतात.

नेमकी कशी होते फसवणुक?

फसवणूक करणारी व्यक्ती स्वतःला बँक किंवा कोणत्याही आर्थिक संस्थेचा कर्मचारी असल्याचे भासवतो. तुमच्या खात्यात काहीतरी अचडण किंवा त्रुटी असल्याचा बहाणा करून तुम्हाला कॉल करते. ही व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करायला सांगते आणि एकता तुम्ही स्क्रीन शेअरिंग सुरू केली की तुमच्या पह्नच्या स्क्रीनवर काय सुरू आहे हे रिअल टाइममध्ये पाहता येते. आर्थिक फसवणूक करणारे तुमच्या मोबाइलमध्ये कीबोर्ड लॉगर नावाचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात.

अशी टाळता येईल फसवणूक

< कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख तपासून बघा.

< विश्वासार्ह व्यक्तीसोबतही स्क्रीन शेअर करणे टाळा.

< मोबाइलमध्ये अननोन सोर्स मधून अॅप्स इन्स्टॉल करण्याचा पर्याय बंद ठेवा.

< संशयास्पद नंबर तातडीने ब्लॉक करा आणि

   cybercrime.gov.in किंवा 1930 या नंबरवर तक्रार करा.

< स्क्रीन शेअरिंग सुरू असताना कधीही युपीआय, बँकिंग किंवा वॉलेट अॅप्सचा वापर करू नका.