
हिंदुस्थानकडून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यापासून पाकिस्तानात भितीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी मेजर व खासदार ताहिर इक्बाल हे आज ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानी संसदेत बोलताना ढसाढसा रडले. ”आम्ही गुन्हेगार आहोत, अल्लाह आमची हिफाजत कर’ असे ते रडत रडत सांगतच आहेतत. त्यांचा संसदेत रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हिंदुस्थानकडून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यापासून पाकिस्तानात भितीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे माजी मेजर व खासदार ताहिर इक्बाल यांचा संसदेत रडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. pic.twitter.com/CGJBd6g1og
— Saamana Online (@SaamanaOnline) May 8, 2025
पाकिस्तानी संसदेत गुरुवारी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-एन या पक्षाचे खासदार तारिक इकबाल हे भाषण करत असताना रडू लागले. यावेळी त्यांनी पाकिस्तानी जनतेची हिफाजत कर अशी अल्लाहाला प्रार्थना कर असे सांगितले.