
ऑपरेशन सिंदूरबाबत उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंग यांनी मोठे विधान केले आहे. या ऑपरेशनदरम्यान देशाने तीन शत्रूंचा पराभव केल्याचे लेफ्टनंट जनरल सिंह यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान हिंदुस्थानने पाकिस्तानसह तुर्की आणि चीनचाही सामना केल्याचे म्हटले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनने पाकला हिंदुस्थानची लाइव्ह माहिती पुरवली, असेही सिंग यांनी सांगितले.
FICCI ने दिल्ली येथे ‘न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमता सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी हिंदुस्थानच्या शत्रूंबाबत मोठं विधान केलं. “आपल्याकडे एक सीमा होती आणि दोन-दोन शत्रू होते. मात्र, प्रत्यक्षात तीन शत्रू होते. पाकिस्तान समोर सीमेवर लढत होता आणि चीन पाकला शक्य होईल ती सर्व मदत पुरवत होता.”
सब लेफ्टनंट आस्था पुनियाने रचला इतिहास, हिंदुस्थानच्या नौदलात बनली पहिली महिला फायटर पायलट
‘पाकिस्तानकडील शस्त्रास्त्रे 81 टक्के चीनी बनावटीची आहेत. हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्ष चीनसाठी एका लाईव्ह प्रयोगशाळेप्रमाणे होता. या संघर्षादरम्यान चीनने आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली, असे सिंग यांनी यावेळी सांगितले. हिंदुस्थानच्या छुप्या व्हेक्टर्सबाबत कल्पना होती म्हणून पाकिस्तानने युद्धबंदीची मागणी केली. चीनप्रमाणे तुर्कीनेही पाकिस्तानला मदत पुवरण्यात भूमिका बजावली, असेही सिंग यांनी पुढे नमूद केले.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या लष्कराने शत्रूच्या तळांबाबत माहिती मिळवली. शत्रूच्या 9 तळांना अचूक लक्ष्य करत हल्ला करण्यात आला. याबाबत लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंग यांनी हिंदुस्थानी सशस्त्र दलांचे कौतुक केले.