ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची संसदेत माहिती

ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झाले आहे अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली. तसेच हे ऑपरेशन अद्याप संपलेले नाही असेही सिंह यांनी यावेळी सांगितले.

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, ठरवलेले सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली होती म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर थांबवले अशी माहिती केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले तसेच भारताने कोणाच्याही दबावामुळे ही कारवाई थांबवली नाही.या ऑपरेशनचा उद्देश पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ नष्ट करणे हा होता. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना आमच्या सैन्याने लक्ष्य केले. ऑपरेशन सिंदूरचा हेतू युद्ध छेडण्याचा नव्हता असेही सिंह म्हणाले.

10 मे रोजी भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या एअरफिल्डवर जोरदार हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने हार मानली आणि त्यांनी भारताच्या डीजीएमओला संपर्क करून ऑपरेशन थांबवण्याची विनंती केली. पण याचा अर्थ असा नव्हता की हे ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आले आहे. हा तर केवळ ‘पॉज’ होता. जर पाकिस्तानकडून पुन्हा काही हालचाल झाली, तर ऑपरेशन पुन्हा सुरू होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये फक्त पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव नाही झाला तर त्यांचे मनोबलही खच्ची झाले असेही सिंह म्हणाले.

विरोधक सतत विचारत असतात की भारताचे किती विमान पाडले गेले. पण त्यांनी कधी विचारले नाही की भारताने पाकिस्तानची किती विमाने पाडली. योग्य प्रश्न असा विचारायला हवा की ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का तर त्याचे उत्तर हो असे आहे असे राजनाथ सिंह म्हणाले.