
ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान मोठा दणका बसला आहे. मात्र, पाकिस्तानने अजून पराभव मान्य केलेला नाही. पाकिस्तानने एकीकडे युद्धबंदी स्वीकारली. दुसरीकडे सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर खोट्या बातम्या, फोटो आणि व्हिडीओची प्रसिद्धी करत आहे. याच्या माध्यमातून पाकिस्तानने कशी कारवाई करून हिंदुस्थानला हरवलं याचा रिपोर्ट देत आहे. हिंदुस्थानची अनेक राफेल आणि इतर लढाऊ विमाने पाडली आहेत, असा दावा करत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. यावर आता अमेरिकेच्या एका प्रसिद्ध लेखकाने पाकिस्तानची पोलखोल केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण बजेट वाढवणार, संरक्षण मंत्रालयाचा 50 हजार कोटी वाढवण्याचा प्रस्ताव
अमेरिकचे सुप्रसिद्ध लेखक रयान मैकबेथ यांनी पाकड्यांच्या दावे खोटे असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान, हमास आणि चीन सतत खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करत आहेत. ते सोशल मीडियावर व्हिडिओ आणि बनावट फोटो वापरून खोट्या बातम्या पसरवत आहेत. आणि याद्वारे आपला पराभव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.
हिंदुस्थानात काहीही लपवून ठेवणे अशक्य आहे
हिंदुस्थान हा एक लोकशाही राष्ट्र आहे. येथे सैन्याच्या प्रत्येक शस्त्र सामग्रीचा हिशेब दिला जातो. हिंदुस्थानने कोणतेही विमान गमावले असते तर त्या संदर्भातील कागदपत्रे, संसदीय अहवाल किंवा मीडिया तपासणीतून उघडकीस आले असते. हिंदुस्थानने राफेल किंवा सुखोई विमान गमावले असते, तर याबाबत लगेचच माहिती मिळाली असती, कारण हिंदुस्थानात काहीही लपवून ठेवणे अशक्य आहे, असे रयान मैकबेथ यावेळी म्हणाले आहेत.
भापड कथांद्वारे दबाव निर्माण करणे ही पाकिस्तानची रणनीती
पाकिस्तानच्या माहिती धोरणात दोन स्पष्ट उद्दिष्टे आहेत. ती म्हणजे एक तर आंतरराष्ट्रीय समुदायाची सहानुभूती मिळवणे, जेणेकरून हिंदुस्थानला ‘आक्रमक’ म्हणून दाखवता येईल. आणि दुसरे ऑपरेशन सिंदूरचे पाकवर झालेले परिणाम लपवून नागरिकांचे आणि सैन्याचे मनोबल राखणे. या दोन्ही उद्देशांसाठी, पाकिस्तान खोट्या बातम्या पसरवून सहानुभूती मिळवत आहे, असे रयान मैकबेथ यांचे म्हणणे आहे.
मध्यरात्री फोन, ऑपरेशन सिंदूरमुळे मोठे नुकसान; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली