
पहलगाममध्ये झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात हिंदुस्थान मोठी कारवाई करण्याच्या तयारीत होता. विविध पातळ्यांवर याची तयारी सुरू होती. अखेर हिंदुस्थानच्या तीनही सैन्यदलाच्या मदतीने ‘ऑपरेशन सिंदूर’ करून हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. रात्री 1.30 च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. हे हल्ले बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद येथे करण्यात आले आहेत. या हल्ल्यांचे वैशिष्ट हे आहे की पाकिस्तान व्याप्त कश्मीर सोबतच पाकिस्तानातील दहशतवादी तळ देखील नष्ट करण्यात आले. ही नऊ ठिकाणे कोणती आणि हीच नऊ ठिकाणे का निवडण्यात आले आहेत याची माहिती आता समोर आली आहे.
- बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय, आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किमी अंतरावर.
2. मुरीदके
लश्कर-ए-तैयबा कॅम्प, सांबा पासून 30 किमी अंतरावर, मुंबई हल्ल्याचे दहशतवादी येथून आले होते.
3. गुलपूर
पुंछ-राजौरी पासून 35 किमी अंतरावर, नियंत्रण रेषेजवळ. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछ वर हल्ला आणि 24 जून 2024 रोजी यात्रेकरूंच्या बसवर हल्ला येथूनच नियोजित होता.
4. सवाई
लश्कर कॅम्प, पीओके जवळील तंगधार सेक्टरमध्ये 30 किमी अंतरावर. 21 ऑक्टोबर 2024 रोजी गंदरबल, 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम वर हल्ला येथूनच नियोजित होता.
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचा लाँचपॅड.
6. कोटली
लश्कर-ए-तोयबा कॅम्प राजौरीजवळ नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर. येथे सुमारे 50 दहशतवादी होते.
7. बरनाला
राजौरीजवळ नियंत्रण रेषेपासून 10 किमी अंतरावर दहशतवादी कॅम्प.
8. सरजल
जैश-ए-मोहम्मद कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून सांबा-कठुआजवळ सुमारे 8 किमी अंतरावर.
9. मेहमूना
सियालकोटजवळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 15 किमी अंतरावर हिजबुल्लाह प्रशिक्षण केंद्र.