तिसऱ्या मुंबईला विरोध, मार्किंगचे पट्टे ग्रामस्थांनी पेट्रोल ओतून जाळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जमीन, घर आणि गाव वाचवा, एमएमआरडीए हटवा’, ‘जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणा देत कोप्रोली येथील ग्रामस्थांनी आज तिसऱ्या मुंबईविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारला. कोप्रोली गावच्या वेशीवर एमएमआरडीएने मार्किंग केलेले पट्टे पेट्रोल ओतून जाळले. हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

एमएमआरडीएने कोप्रोली गावच्या वेशीवर काळे २ एप्रिल रोजी पिवळे चौकटीत मार्किंगला केले होते. संतप्त झालेल्या कोप्रोली ग्रामस्थ व सर्व पक्षांच्या प्रमुख कार्यकत्यांनी एकत्र येत या मार्किंगला काळे फासून निषेध केला. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करत ग्रामस्थांनी या मार्किंगवर टायर जाळून सरकार आणि आहे. एमएमआरडीएला इशारा दिला

सरकारचे धोरण फसवे
एमएमआरडीए केएससी नवनगर विरोधी समितीचे सरचिटणीस रुपेश पाटील यांनी सरकारने तिसऱ्या मुंबईसाठी जाहीर केलेल्या भूसंपादनाच्या शासन निर्णयाची माहिती यावेळी दिली. सरकारचे धोरण फसवे आणि शेतकरी विरोधी असून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनी संघटित राहून संघर्ष केला नाही तर भविष्यात आपली मूळ गावठाणाबाहेरील घरेही बेकायदेशीर ठरतील, असा इशारा देण्यात आला.