
जगात सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत चांगलीच उलथापालथ होताना दिसत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क सध्या 368 अब्ज डॉलर्ससह पहिल्या नंबरवर आहेत, परंतु पहिल्यांदाच ओरेकलचे संस्थापक लॅरी एलिसन हे मस्क यांना टक्कर देण्याच्या तयारीत दिसत आहेत. एलिसन यांची एकूण संपत्ती 299 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. ते लवकरच 300 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या वर्षी मस्क यांच्या नेटवर्थमध्ये 64.1 अब्ज डॉलरची घसरण झाली आहे, तर लॅरी एलिसन यांच्या संपत्तीत 107 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
अंबानी 18 व्या स्थानावर
हिंदुस्थानातील उद्योगपती मुकेश अंबानी हे जगातील अब्जाधीशांच्या यादीत 18 व्या स्थानावर आहेत. 2025 मध्ये त्यांच्या संपत्तीत 9.48 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.
टॉप 10 अब्जाधीश
- इलॉन मस्क – 368 अब्ज डॉलर
- लॅरी एलिसन – 299 अब्ज डॉलर
- जेफ बेजोस – 253 अब्ज डॉलर
- मार्क झुकरबर्ग – 252 अब्ज डॉलर
- स्टीव्ह वॉल्मर – 176 अब्ज डॉलर
- लॅरी पेज – 173 अब्ज डॉलर
- सर्गेई अरनॉल्ट – 162 अब्ज डॉलर
- बर्नार्ड अर्नोल्ट – 160 अब्ज डॉलर
- जेंसन हुआंग – 154 अब्ज डॉलर
- वॉरेन बफे – 145 अब्ज डॉलर