
राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त परळ येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनने अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करत अवयवदानाची एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे. या ठिकाणी ब्रेन डेड झालेल्या चार लहान मुलांच्या कुटुंबीयांचा त्यांचे अवयवदान केले असून या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला आहे.
अवयवदान करण्याच्या त्यांच्या या निर्णयाने गरजू व्यक्तींना जीवनदान मिळाले असून या कार्यक्रमप्रसंगी यावेळी अभिनेता ताहेर शब्बीर, रुमाना हमीद (व्यवस्थापकीय विश्वस्त सिप्ला फाऊंडेशन आणि विश्वस्त – सिप्ला पॅलिएटिव्ह केअर अॅण्ड ट्रेनिंग सेंटरचे) आणि वाडिया हॉस्पिटल्सच्या संचालिका डॉ. मिनी बोधनवाला उपस्थित होते. वाडिया हॉस्पिटलने अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एखाद्या रुग्णाला नवे आयुष्य मिळवून देण्यासाठी मुंबईत ‘द वॉल ऑफ ऑनर’चे अनावरण केले. या माध्यमातूम अवयवदान करत बालरुग्णांच्या पालकांनी आणि कुटुंबांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे आम्हाला अतिशय काwतुक वाटते. आमचे रुग्णालय प्रगत बालरोग आरोग्य सेवा प्रदान करत देशाच्या प्रत्येक कानाकोपऱयात पोहोचल्याचे वाडिया हॉस्पिटल्सच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले.
दरम्यान, वाडिया रुग्णालयात लहान मुलांवर आतापर्यंत अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाडिया रुग्णालय आणि त्यात काम करणाऱ्या डॉक्टरांबद्दल, वैद्यकीय सेवा देणाऱया कर्मचाऱ्यांबद्दल समाजात विश्वास निर्माण झाला आहे.
यकृत, मूत्रपिंड, किडनी प्रत्यारोपण यशस्वी
वाडिया येथे अवयव प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू झाल्यापासून हॉस्पिटल, जिवंत दात्यांचे एक यकृत आणि तीन मूत्रपिंड प्रत्यारोपण तर तीन यकृत आणि चार किडनी कॅडेव्हरिक प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले आहे.