
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेत संघटनात्मक बदल केले आहेत. विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी म्हणून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेत फटका बसलेल्या हरयाणा व झारखंडमध्येही विधानसभेसाठी नव्या प्रभारींच्या नावाची घोषणा झाली आहे. निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे जबाबदारी देऊन महाराष्ट्र भाजपचे प्रभारी दिनेश शर्मा यांचे पंख छाटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लोकसभा निवडणुकीत 400 पारच्या घोषणा देणाऱया भाजपला महाराष्ट्रातील मतदारांनी चांगलाच दणका दिला आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेत महाराष्ट्रातील नेत्यांना जाब विचारला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीऐवजी संघटनात्मक काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती, पण तूर्तास काम सुरू ठेवण्यास अमित शहा यांनी सांगितले होते.
फटका बसलेल्या राज्यात नव्या नियुक्त्या
लोकसभा निवडणुकीत भाजपला हरयाणा व झारखंडमध्ये मोठा फटका बसला आहे. हरयाणात भाजपच्या पाच तर झारखंडमध्ये भाजपच्या तीन जागा कमी झाल्या. त्यामुळे हरयाणामध्ये विधानसभेसाठी केंद्रीय मंत्री धरेंद्र प्रधान यांची तर झारखंडमध्ये विधानसभेसाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांची नियुक्ती केली आहे.
रेल्केमंत्री, पर्याकरणमंत्री आपली खाती सांभाळणार की, महाराष्ट्राच्या राजकारणात ढकळाढकळ करणार?
आदित्य ठाकरे यांचा टोला
केंद्रातील भाजप सरकारने रेल्केमंत्री आणि केंद्रीय पर्याकरणमंत्र्यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी पदी नियुक्ती करून भाजपने आधीच नासकून ठेकलेल्या महाराष्ट्रातील राजकारणाला अधिक घाणेरडे करणार आहेत. अत्यंत महत्त्काची खाती असणारे हे मंत्री आपल्या खात्यांचा कारभार करणार की, काम- धाम सोडून महाराष्ट्राच्या राजकारणात ढकळाढकळ करत बसणार, असा खोचक टोला शिकसेना नेते, युकासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगाकला आहे.
त्याऐकजी या प्रश्नांकडे लक्ष द्या
रेल्केमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गोंधळ घातले आहेत. जनरल डब्यातील गोंधळ कायम आहे, ज्येष्ठांसाठी असलेल्या सकलती काढून घेतल्या, रेल्केकडून देण्यात येणाऱया सुकिधांची पुरती काट लाकली आहे. नागरी पायाभूत सुकिधांमध्ये अनेक मोठय़ा चुका करून ठेकल्या आहेत. लोअर परळमधील डिलाईल रोड उड्डाणपूल आणि अंधेरीचा गोखले पुलाचा गोंधळ सगळ्यांना माहीत आहे. त्यात र्ल्केच्या अपघातांचाही समाकेश आहे. असा मंत्री आता महाराष्ट्राच्या राजकारणात ढकळाढकळ करणार आहे.