Pahalgam Attack – मध्यरात्री मोठ्या घडामोडी, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांना फोन

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. महाशक्ती अमेरिकेनेही या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत हिंदुस्थानला पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असून याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना फोन केला आणि चांगलेच फटकारले. तसेच त्यानंतर हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशीही फोनवरून संवाद साधला.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिनो यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले आहे. मार्को रुबिनो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याचा निषेध करावा आणि दोषींवर कारवाई करण्यासाठी मदत करावी, असे अमेरिकेने पाकिस्तानला सांगितले. याबाबत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक निवेदनही जारी केले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी संकटाच्या काळात हिंदुस्थानला उघडपणे पाठिंबा दिला आहे. दहशतवादाविरूद्धच्या लढाईमध्ये अमेरिका हिंदुस्थानसोबत आहे, असे मार्को रुबियो यांनी म्हटले. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान यांना फोन करून पहलगाम हल्ल्यावरून चांगलेच सुनावले.

पाकड्यांची झोप उडाली; हिंदुस्थान पुढील 24 ते 36 तासांत हल्ला करणार, मध्यरात्री PC घेत मंत्र्यांची माहिती

पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करणे आणि या हल्ल्यातील दोषींना शिक्षा करणे ही जबाबदारी पाकिस्तानची आहे, असे मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला सांगितले. तसेच हिंदुस्थानसोबतचा वाढता तणाव कमी करण्यासाठी, संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी आणि दक्षिण आशियात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन अमेरिकेने पाकिस्तानला केले.

दरम्यान, मार्को रुबियो यांनी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशीही चर्चा केली. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांप्रती मार्को रुबियो यांनी शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्ध लढाईत हिंदुस्थानला सहकार्य करण्यासाठी अमेरिका प्रतिबद्ध आहे, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

कंगाल पाकिस्तानने पुन्हा हात पसरले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे मागितले 11 हजार कोटी