
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसेच दोन नवीन हेडक्वार्टर स्थापन करण्यास केंद्राने मंजूरी दिली आहे. नवीन बटालियनमध्ये सुमारे 17,000 जवान असतील. या निर्णयामुळे वाढत्या सुरक्षा आव्हानांना आणि सीमेवरील दक्षतेला बळकटी मिळेल.
पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांवर देखरेख करण्यासाठी त्यांच्या पश्चिम आणि पूर्व कमांडसाठी दोन नवीन फॉरवर्ड मुख्यालये स्थापन करण्याची योजना आहे. एक मुख्यालय जम्मूमध्ये असेल जम्मूमध्ये जे जम्मू आणि पंजाबमधील हिंदुस्थान-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेची सुरक्षा मजबूत करेल. दुसरीकडे, बांगलादेश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी मिझोरममध्ये एक मुख्यालय बांधले जाईल. जम्मूमध्ये डीआयजी-रँक अधिकाऱ्यांच्या अंतर्गत असलेल्या सेक्टरमध्ये राजौरी, सुंदरबनी, जम्मू आणि इंद्रेश्वर नगर यांचा समावेश आहे, तर मिझोरम आणि कछार सीमा सेक्टर सिलचर, ऐझॉल आणि मणिपूर येथून कार्यरत आहेत.
सीमा सुरक्षा दल (BSF) केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून काही अंतिम मंजुरींसह उर्वरित मंजुरी आवश्यक आहेत. मंजुरीनंतर संपूर्ण प्रक्रियेसाठी पाच ते सहा वर्षे लागू शकतात. सीमा सुरक्षा दलात सध्या 193 बटालियन आहेत. प्रत्येक बटालियनमध्ये 1,000 हून अधिक जवान असतात.