Pahalgam Terror Attack – मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात हाय अलर्ट

फाईल फोटो

जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. सर्व वरिष्ठ निरीक्षकांसह एसीपी, उपायुक्त यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून विशेष खबरदारी घेण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिसांनी अधिक सतर्क होत शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता विशेष खबरदारी घेतली आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी, हॉटेल, लॉजिंग तपासणी करण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

अमित शहा तातडीने श्रीनगरमध्ये; आज दिल्लीत उच्चस्तरीय बैठक

सौदी अरेबियाच्या दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा पह्नवरूनच आढावा घेतला. तर पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा तातडीने श्रीनगरला रवाना झाले आहेत. त्यांनी ‘एक्स’वरून याबाबतची माहिती दिली आहे. शहा यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली असून या बैठकीला गृह मंत्रालय आणि आयबीचे उच्च अधिकारी उपस्थित असणार आहेत.

मोदी दौरा अर्धवट सोडून सौदीतून माघारी निघाले

दहशतवादी हल्ल्याबाबत पह्नवरून माहिती आणि आढावा घेतल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱयावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

केंद्राचे पोकळ दावे उघड

दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे. सरकार कश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे करत असलेले दावे आता पोकळ असल्याचे उघड झाले आहे. असे दावे करण्याऐवजी सरकारने दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलावीत. जेणेकरून असे हल्ले पुन्हा होणार नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

केवळ निषेध नको, चोख प्रत्युत्तर द्या

या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा केवळ निषेध नको तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचे आणि नागरिकांचे रक्षण केले जाईल अशी अपेक्षा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे दिली. हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे, असे नमूद करत त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.